मोक्का प्रकरणात फरार असलेले आरोपी अचानक न्यायालयासमोर शरण संदिप नागरे
महाराष्ट्र

मोक्का प्रकरणात फरार असलेले आरोपी अचानक न्यायालयासमोर शरण

हिंगोली पोलिसांनी (Hingoli Police) मोक्का प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या तीन आरोपींना आज अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संदिप नागरे

हिंगोली पोलिसांनी (Hingoli Police) मोक्का प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या तीन आरोपींना आज अटक केली आहे. या आरोपीमध्ये हिंगोली पालिकेत नगरसेवक असलेल्या नाना उर्फ नरसिंग नायक याचा देखील समावेश आहे. पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले होते त्यामुळे आता अटक केलेल्या आरोपींची संख्या ही सहा झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हे आरोपी महाराष्ट्र राज्यातून परराज्यात फरार झाले होते. हिंगोली पोलिसांची विविध पथके या आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती . मात्र आज हे आरोपी अचानक न्यायालया समोर शरण आले , त्या नंतर न्यायालयाने या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, मागील महिन्यात या गुन्ह्यात तीन आरोपींना पोलिसांनी उत्तरप्रदेश मधून अटक देखील केली होती, मात्र या गुन्ह्यातील आरोपी नाना उर्फ नरसिंग नायक याच्या सह दोघे पोलिसांना हवे होते हिंगोली शहर, हिंगोली गुन्हे शाखा या तिघांचा शोध घेत असताना आज हे तिघे आरोपी न्यायालया समोर शरण आले. आरोपी शरण येताच न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले, पोलिसांनी या आरोपींना अटक करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

SCROLL FOR NEXT