SHOCKING VIDEO: SCHOOL STUDENTS CAUGHT CONSUMING DRUGS INSIDE CLASSROOM IN THANE saam tv
महाराष्ट्र

शाळा बनतायत ड्रग्जचे अड्डे, शाळकरी मुलांना ड्रग्जचा विळखा

From Classroom to Crime: आता पालकांची झोप उडवणारी बातमी...... तरुणाई ड्रग्जच्या सापळ्यात अडकलीय...त्याच्या बातम्या तुम्ही पाहत आणि ऐकत असतात...मात्र आता शाळकरी मुलंही ड्रग्जच्या विळख्यात अडकलीय...होय..तुम्ही ऐकलं ते खरंय. थेट वर्गात मुलांनी ड्ग्जचं सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलंय..नेमक्या कोणत्या शहरात आणि कोणत्या शाळेत हा प्रकार घडलाय? पाहूयात हा रिपोर्ट........

Snehil Shivaji

धक्कादायक.. भयानक.. भयावह.. हे शब्द अपुरे पडतील अशी घटना ठाण्यात घडलीये. मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी जे पालक अथक प्रयत्न करतात त्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकेल. वैभवसंपन्न ठाण्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांनी ज्या बाकावर बसून उज्वल भविष्याचे धडे घ्यायचे असतात, त्याच बाकावर बसून आपली आयुष्यं राखरांगोळी करणारं हे जळजळीत वास्तवये.

ठाण्यातल्या एका नामांकित शाळेतले हे विद्यार्थी वर्गात बाकावर बसलेत. प्रथमदर्शनी हे मुलं एकमेकांशी गप्पा मारतायत असंच वाटेल... पण जरा डोळे उघडे ठेवून ही दृश्यं नीट पाहा. वर्गातल्या एका विद्यार्थ्याच्या हातावर टॅटू आहे, तो दुसऱ्या मुलासमोर मोबाईल धरतो. त्या मोबाईलच्या स्क्रीनवर पांढऱ्या शुभ्र ड्रग्जची लाईन स्पष्ट दिसतेय.. तिसरा मुलगा या संपूर्ण कृत्याचं मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करतोय. आणि पुढील काहीच सेकंदांत... हा मुलगा खाली वाकतो आणि एखाद्या सराईत नशेखोरासारखा नाकाने ड्रग्ज ओढतो.. हे सगळं करून अवघ्या काही सेकंदांत तो आजूबाजूला बघत पुन्हा काही घडलंच नसल्याचं भासवतो.

ही दृश्यं पाहून कोणत्याही पालकाचं काळीज पिळवटून निघेल. ज्या शाळेला आपण शिक्षणाचं पवित्र मंदिर मानतो, त्या मंदिरालाच नशेखोरांनी आणि ड्रग्ज पेडलर्सनी आपला अड्डा बनवलाय की काय? असा संतापजनक सवाल आता प्रत्येक जण विचारतोय. ठाण्यातलं हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीचं प्रकरण ताजं असताना आता थेट शाळेत ड्रग्ज पोहचल्यामुळे सामनं काही सवाल उपस्थित केलेत.

शाळांमध्ये मुलांपर्यंत ड्रग्ज कुठून येतं?

विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोहचेपर्यंत ठाणे पोलीस काय करतात?

विद्यार्थी ड्रग्ज सेवन करत असताना शिक्षक काय करत होते?

शाळेत विद्यार्थ्यांकडे दोन-दोन मोबाईल आले कसे?

मुलांना शाळेत ड्रग्स पुरवणारा अद्याप मोकाट कसा?

हा ड्रग्जचा विळखा मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन जेवढं जबाबदार आहे, तितकीच जबाबदारी शाळांची आणि पालकांची सुद्धा आहे. मुलाला शाळेत पाठवलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे? त्याचा मित्र परिवार कसा आहे? त्याच्या वागण्यात काय बदल होतोय? यावर प्रत्येक पालकाने नजर ठेवणं हीच काळाची गरज बनलीय असं म्हणलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT