Thane Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Thane Water Supply : ठाण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा बंद; पाईप लाईन दुरुस्तीचे काम असल्याने एक दिवस उशिराने पाणी

Thane News : ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा शुकवार (२० सप्टेंबर) रात्री बारा वाजेपर्यत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने या काळात ठाण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एक दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

ठाणे (Thane) महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर (Water Supply) होणार आहे. ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा शुकवार (२० सप्टेंबर) रात्री बारा वाजेपर्यत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागात पाणी पुरवठा बंद 
ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Harihar Fort history: महाराष्ट्रातील एक धोकादायक किल्ला! वाचा हरिहर किल्ल्याच्या नावाचा रहस्यमयी इतिहास

Mumbai : मुंबईकरांची मोठी अडचण कायमची मिटली! ३ नवीन महाप्रकल्प सेवेत; पाहा तुमचा कोणता प्रवास सोपा होणार?

Nagpur Fort : नागपूरच्या मध्यभागी उभा असलेला शौर्याचा साक्षीदार, 'या' किल्ल्यावर गेल्यावर अनुभवा समृद्ध इतिहास

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरमधील यशच्या 'त्या' सीनची तुफान चर्चा; प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक, वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT