Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane News: साहेब आतातरी एकत्र या..ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित बॅनर

साहेब आतातरी एकत्र या..ठाण्यात शिवसेना ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित बॅनर

विकास काटे, ठाणे

ठाणे : सध्या राज्यात राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून (Thane) राजकीय गदारोळ सुरू आहे. राजकारणातील हे डावपेच पाहून आता सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सुरू असलेल्या राजकीय गदारोळपासून सुटका करण्यासाठी ठाण्यातील (Shiv Sena) शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी मिळून एक बॅनर लावला आहे. यातून साहेब आतातरी एकत्र या..अशी आर्त हाक शिवसेना ठाकरे व मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे. (Tajya Batmya)

ठाण्यातील मनसे सैनिक प्रवीण वेलोसे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रदीप उतेकर यांनी हा बॅनर लावला आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरातील घंटाळी येथील तीन पेट्रोल पंप परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावले आहेत.

बॅनरवर असा आहे मजकूर

साहेब आता तरी एकत्र या..अशी हाक दिली आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे.. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्‍त आणि फक्त ठाकरे सरकार पाहिजे..साहेब.. एकत्र या.. एकत्र या.. एकत्र या.. अशा आशयाचा हा बॅनर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT