Thane Police Saam tv
महाराष्ट्र

Thane Police : एकाच रात्रीत १४ घरफोड्या; १०० सीसीटीव्ही तपासणीनंतर दोघे चोरटे ताब्यात

Thane News : ठाणे पोलीस आयुक्तालयातील नौपाडा परिसरात एकाच रात्री सलग १४ गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या चोरी केल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरट्यानी एकाच रात्रीत १४ ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी दोघा आरोपीना ठाणे गुन्हे शाखा घटक १ ठाणे यांनी अटक केले असून त्यांच्याकडून २ लाख २६ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास करत आहेत. 

ठाणे पोलीस आयुक्तालयातील नौपाडा परिसरात एकाच रात्री सलग १४ गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या चोरी केल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक १ ठाणे कडून करण्यात येत होता. या तपासात गुन्ह्यांचे समांतर तपासामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. 

१०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी 

सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या वर्णनावरून त्यांचे ठाणे रेल्वे स्टेशन व मीरा रोड व उल्हासनगर या मार्गक्रमणातील एकूण १०० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करण्यात आली. तसेच करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषण मध्ये आरोपींच्या वर्णनावरून स्थानिक रिक्षा चालक हॉटेल व्यावसायिक यांचेकडे तपास करून आरोपी महंन्त भाने कामी (वय २३) आणि विष्णु रगुवा कामी (वय ३६) या दोघांना २० मार्च २०२५  रोजी अटक केली आहे. 

सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले महंत कामी व विष्णू कामी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून २ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या चोरटयांनी आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT