Pune crime News Saam tv
महाराष्ट्र

Firing on youth in Thane: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर झाडली गोळी, अंबरनाथमधील थरारक घटना

साम टिव्ही ब्युरो

>>अजय दुधाणे, साम टीव्ही

Thane Crime News: अंबरनाथमध्ये बदलापूर रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलोक यादव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असून तो गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या प्रकणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण बदलापूर रोडवर अंबरनाथ येथून अलोक यादव आपल्या दुचाकीवरून उल्हासनगरच्या दिशेने जात होता. तो ऑडनस फॅक्टरी जवळ आला तेव्हा समोरून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर रिव्हॉल्व्हमधून गोळी झाडली. दुचाकीवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातले होते असे जखमी आलोकने सांगितले. (Tajya Marathi Batmya)

आलोक यादव याला कल्याणजवळील म्हारळ गावात राहणारा असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. आलोकला जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या मांडीत गोळी अडकल्याने त्याला मुंबई येथे उपचारात पाठविण्यात आले आहे. (Latest Political News)

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र या घटनेत पोलीस काहीही बोलण्यास तयार नसून गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देऊ असे पोलिसांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT