Thane Crime Saam tv
महाराष्ट्र

Thane Crime : मैत्रिणीचे फोटो डिलीट न केल्याने युवकाची हत्या; ठाण्यातील धक्कादायक घटना

Thane News : अष्टविनायक चौक परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये घुसून स्वयम याच्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली

विकास काटे, ठाणे

ठाणे : मोबाईलमध्ये काढलेले फोटो डिलीट न केल्याच्या किरकोळ कारणावरून युवकाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. सदरची धक्कादायक घटना ठाण्यातील कोपरीमधील अष्टविनायक चौक परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणीसह तिच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

स्वयम परांजपे असे सदर घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ठाण्यातील कोपरीमधील अष्टविनायक चौक परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये घुसून स्वयम याच्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेबाबत पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात मृत स्वयम याने त्याच्या मैत्रिणीचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो डिलीट करण्यास सांगितले होते. 

दरम्यान मैत्रिणीचे काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगून देखील ते न केल्यामुळे स्वयम याची हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मुलीसह तिचा मित्र मयुरेश धुमाळ यास पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणी कोपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero चा धमका! लाँच केली Activaहून स्वस्त स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही

EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

Ambad News : नदीच्या पुरात रस्ता बंद; रुग्णालयात नेता न आल्याने आजीच्या खांद्यावरच नातवाने सोडले प्राण, अंबड तालुक्यातील घटना

पोलिसांच्या व्हॅनवर चढून कपलचा धिंगाणा, एकमेकांना मिठ्या मारत शिवीगाळ अन्..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT