Ujjwal Nikam Saam Tv
महाराष्ट्र

Ujjwal Nikam On Shivsena Symbol: ...तर धनुष्यबाण चिन्ह कायमचं गोठवलं जाऊ शकतं; उज्ज्वल निकम काय म्हणाले? वाचा...

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाला मिळणार? यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आले. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारीला होणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना एक मोठं विधान केलं आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याचा निर्णय लागण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. असं उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागत असेल तर कदाचित आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते, अशी शक्यता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Political News)

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे अकोल्यात आले होते यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षांचे राजकीय चिन्ह किंवा त्या राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी निवडणूक आयोग प्रामुख्याने संबंधित राजकीय पक्षाची घटना आणि त्या घटनेनुसार त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडून आले आहेत का? ते कोणाच्या बाजूने आहेत? ही बाब तपासते.

त्यानंतर राजकीय पक्षाचे आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे कोणत्या गटाचे जास्त आहेत हे देखील तपासले जाते. या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते. त्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT