UBT Sena faces internal turmoil as key MPs skip crucial Matoshree meeting, fueling speculation of a possible split. saam tv
महाराष्ट्र

ठाकरेसेनेत पुन्हा उभी फूट? ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: ठाकरेसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता आहे. ठाकरेसेनेच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोण आहेत हे खासदार? कुणावर देण्यात आली आहे ऑपरेशन टायगरची जबाबदारी? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Suprim Maskar

शिवसेनेत पुन्हा एकदा उभी फूट पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत... कारण ठाकरेसेनेचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारी असल्याचं बोललं जातयं....गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरु आहे...आणि त्याला कारण ठरलयं...उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीत 5 खासदारांची अनुउपस्थिती... मातोश्रीवरील बैठकीला दांडी मारणारे ठाकरेसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्यानं खासदारांच्या फुटीच्या चर्चेला पुन्हा उधाण आलयं.... त्यात पक्षात सन्मान होत नाही त्यावेळी लोक वेगळा विचार करतात, असं म्हणत प्रतापराव जाधवांनी फुटीचे संकेत दिलेत...तर दुसरीकडे संजय देशमुखांना दिल्लीत जायला नागपुरातून फ्लाईट मिळालं मात्र मुंबई यायला त्यांना फ्लाईंट नव्हतं असं सांगत राऊतांनीच खासदारांच्या बंडखोरीबाबत सूचक विधान केलं.

मातोश्रीवरील बैठकीनंतर याचं संजय राऊतांनी X वर पोस्ट करून काही खासदार ऑनलाईन बैठकीला हजर राहिल्याचा दावा केला होता... इतकचं काय तर पक्षातील फुटीला त्यांनी थेट अफवा म्हटलं होतं... मात्र आता अवघ्या 24 तासात ठाकरेसेनेतील फुटीच्या हालचाली सुरू असल्याचं पुढं आलंय. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील बैठकीला कोणत्या खासदारांनी दांडी मारली होती ते पाहूयात.

मातोश्रीवरील बैठकीला गैरहजर खासदार

संजय देशमुख

यवतमाळ

नागेश पाटील आष्टीकर

हिंगोली

संजय जाधव

परभणी

भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी

ओमराजे निंबाळकर

धाराशिव

शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांसाठी ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज नसल्याचा टोला उदय सामंतांनी लगावलाय. तर भाजप नेते मुनगंटीवारांनी जुन्या इतिहासाचे दाखले दिले आहेत. ठाकरेसेनेतील खासदारांच्या फुटीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे..मात्र पश्चिम बंगालमध्ये टीएमसी फुटल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग आल्याचं दिसतंय. ठाकरेसेनेच्या खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदारांची गरज आहे. मात्र बैठकीला अनुपस्थित असलेल्या पाच खासदारांच्या नावांची चर्चा सुरू असून सहावा खासदार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलाय़. मात्र चार वर्षात ठाकरेंना दुसऱ्यांदा फुटीला सामोरं जावं लागणार का? फुटलेले खासदार भाजपात विलीन होणार की शिंदेसेनेत याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै पर्यंत

Mawa Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि गोड मावा खीर, वाचा सोपी रेसिपी

ठाकरेंची पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की; पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

IND A vs SL A: सुपर ओव्हरनंतर जोरदार वाद; श्रीलंकेच्या खेळांडूंचा आक्रस्ताळेपणा,वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की

भाजप मंत्र्याच्या पुतण्याचा चिनी मांजामुळे गळा कापला; रुग्णालयात साडेतीन तास चाललं ऑपरेशन, प्रकृती नाजूक

SCROLL FOR NEXT