Rebel MPs from Thackeray Sena spark political turmoil amid Operation Tiger developments. saam tv
महाराष्ट्र

ठाकरेसेनेचा पुन्हा पोपट मेला, ठाकरेसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब

“Thackeray Camp Hit by Fresh Blow as 6 MPs Rebel”: ठाकरेसेनेचा पोपट पुन्हा एकदा मेलाय... खासदारांच्या बंडानं ठाकरेसेनेत अस्वस्थता पसरलीय... मात्र खासदारांच्या फुटीनंतर नेमकं काय घडलं? ठाकरेसेनेवर खासदारांची नाराजी नेमकी का होती? खासदारांचं विलिनीकरणाचा मुहूर्त नेमका कोणता आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ठाकरेसेनेतील फुटीच्या चर्चेनंतर पक्षानं संसदीय बैठक बोलवली... खासदारांना व्हीप जारी केला... मात्र ऐनवेळी बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारल्यानं खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट अखेर अपयशी ठरली... आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं...मात्र त्याचवेळी बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत स्वतंत्र गटाची आणि शिंदेसेनेतील विलिनीकरणाची मागणी केलीय....त्यामुळेच ठाकरेसेनेत संतापाची लाट पसरलीय.

विशेष म्हणजे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतरही फुलप्रुफ प्लॅन समोर येऊ द्यायचं नाही, असं शिंदेसेनेनं ठरवलयं...त्यामुळे ठाकरेसेनेचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जाणार हे निश्चित आहे... त्यामुळे शिंदेसेनेतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त पुढे ढकलण्याचीही चर्चा आहे...मात्र या फुटीर गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

दरम्यान 17 जूनच्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बंडखोर 6 खासदारांसोबत सुमारे 30 ते 35 मिनिटे ऑनलाईन बैठक घेतली. "मी तुमच्या पाठीशी उभा आहे, काळजी करू नका," असा शब्द शिंदेंनी या खासदारांना दिल्याचंही बोललं जातयं....विशेष म्हणजे या ऑपरेशनची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदेंकडे देण्यात आली होती...त्यात ठाकरेसेनेच्या काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणामुळे बंडखोरी केल्याचा दावा खासदारांनी केल्याची चर्चा आहे...भाजप आमदार आशिष देशमुखांनी तर ठाकरेसेनेवर काँग्रेसमधील विलिनीकरणावर टीका केलीय....

दुसरीकडे बंडखोरीनंतर ठाकरेसेनेचे खासदार वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय...

खासदार नागेश आष्टीकर चेन्नईला तिरुपतीच्या दर्शनाला रवाना

खासदार भाऊसाहेब वाघचौरे वाराणसीला रवाना

खासदार संजय देशमुख आणि संजय जाधव अयोध्येला गेले

खासदार संजय दिना पाटील मुंबईला परतले

खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याला आले

दरम्यान शिवसेनेच्या वर्धापनदिनी बंडखोर 6 खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश होणार नाही... तर 20 जूनला शिंदेसोबतच्या भेटीनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी झालेल्या भेटीचे तपशील तसेच पक्ष सोडण्यामागील कारणे स्पष्ट करून पत्र प्रसिद्ध करण्याची शक्यता वर्तवली जातेय..त्यामुळे ऑपरेशन टायगर' फत्ते झाले असले तरी खासदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप गुलदस्त्यात आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT