“Allegations of massive cash deals emerge as six MPs break away from Thackeray Sena, sparking political controversy in Maharashtra.” saam tv
महाराष्ट्र

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

Thackeray Sena Mp Split Contractor Money Allegations: ठाकरेसेनेचे 6 खासदार अखेर फुटलेत... मात्र हे खासदार कोणी फोडले? मराठवाड्यातल्या कोणत्या कंत्राटदारानं या खासदारांना पैसे दिल्याचा आरोप होतोय? खासदारांच्या फुटीत खरचं आर्थिक व्यवहार झालाय का?

Suprim Maskar

शिवसेनेत दुसऱ्यांदा झालेल्या फुटीनंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय... एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर 50 खोक्यांची घोषणा राज्यात चर्चेचा विषय ठरली होती... अशातच ठाकरेसेनेतील खासदारांच्या फुटीनंतर यावेळीही कथित आर्थिक व्यवहाराचे आरोप खासदारांवर होऊ लागलेत.... मराठवाड्यातील एका कॉन्ट्रेक्टरनं 6 बंडखोरांना पैसे पुरवल्याचा मोठा गौप्यस्फोट ठाकरेसेनेच्या चंद्रकांत खैरेंनी केलाय.....

बंडखोरीच्या महिनाभरापूर्वीच पैशांचे टोकन देण्यात आलं. मराठवाड्यातील एक मोठा कॉन्ट्रॅक्टरला पैसे पुरवण्याची जबाबादारी देण्यात आली होती.. 6 खासदारांचे पैसे कॉन्ट्रॅक्टरनं पुरवायचे, अशी अट होती... त्यात खासदारांना पैसे मिळाल्यावर मोठं काम देण्याचं कॉन्ट्रॅक्टरला आश्वासन देण्यात आलं...त्यामुळे फुटीनंतर कॉन्ट्रॅक्टरनं प्रत्येक खासदारांला घरपोच पैसे पाठवल्याची चर्चा आहे...

मुळात चंद्रकांत खैरेंआधी खासदार संजय राऊतांनीही बंडखोर खासदारांवर पैशांच्या व्यवहाराचे गंभीर आरोप केलेत... प्रत्येकी 50 कोटींमध्ये खासदारांची डील झाल्याचा आरोपही राऊतांनी केला होता. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फुटलेल्या एका खासदाराचा रेट 85 कोटी असल्याचाही आरोप केलाय.. त्यामुळे खासदारांच्या फुटीमागे पैशांचे व्यवहार कारणीभूत आहेत का असा सवाल उपस्थित झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे. समाजसेवेसाठी मिळालेली पद, प्रतिष्ठा फक्त पैशांसाठी लोकप्रतिनिधींकडून गहाण ठेवली जातेय का? हा खरा सवाल आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT