Maharashtra Political News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics :'समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही, तर...'; संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

'समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही. पक्ष हा रक्त घामातून बनतो, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय आहे. कचऱ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे भाषण करतात. शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा आहे. त्याला आग लागते आणि धूर निघतो', अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

संजय राऊत यांनी शिंदे गटासहित मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. 'समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही. पक्ष हा रक्त घामातून बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून नेतात. आमचं बिऱ्हाड जर्मनीला गुंतवणूक आणण्यासाठी जातात, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

सध्या नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला. 'आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्या पासून त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्तीसाठी चांगलं. त्यांनी माझी ओळख काढण्याचा प्रयत्न केला, तर माझं नाव संजय राऊत आहे, असा सज्जड दम संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सज्जड दम दिला.

'राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड, कुठे येवू, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT