Sushma Andhare News  Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: 'हा तर सर्वात मोठा जोक...' सुषमा अंधारेंनी उडवली CM शिंदेंच्या सभेची खिल्ली; श्रीकांत शिंदेवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: त्यांचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहीत आहे. गर्वाचे घर खाली असते. त्यांना लोकच उत्तर देतील," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय सुर्यवंशी..

Sushma Andhare On Eknath Shinde: उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरील सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रामदास कदम यांनी सभा घेतली. या सभेतून जशास तसे उत्तर देत शिवसेनेने ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "मी काम करणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून फक्त आदेश देणाराच मुख्यमंत्री नाही," अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना याच मातीत गाडणार असल्याचे सांगत रामदास कदम यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या सभेवर आता सुषमा अंधारेंनी निशाणा साधत जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाल्या सुषमा अंधारे..

सुषमा अंधारे यांची मुखेड येथे महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच निशाणा साधला आहे. खेड येथील ही सभा उद्धव ठाकरे यांना उत्तर देणारी असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. "त्यांचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहीत आहे. गर्वाचे घर खाली असते. त्यांना लोकच उत्तर देतील," असा टोला त्यांनी लगावला.

तसेच मी गद्दार नाही खुद्दार आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथील सभेत केले होतं. त्यावरूनही अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. "गेल्या दहा वर्षातला हा अत्यंत सुंदर आणि दर्जेदार विनोद आहे," अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, उल्हास नगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. "ज्या अनिल जयसिंघानियाच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असल्याचा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला. जयसिंघानिया यांची जवळीक कोणाची? याचा तपास झालाच पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT