Sushma Andhare Amruta Fadanvis Latest News Saamtv
महाराष्ट्र

Sushma Andhare News: कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरे? सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांना टोला; फेसबूक पोस्ट चर्चेत..

Sushma Andhare On Amruta Fadanvis: "सुषमा अंधारे या माझ्यासारख्या वाटत होत्या," असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. या विधानावरच अंधारे यांनी सवाल केला आहे.

Gangappa Pujari

Sushma Andhare Viral Post: नुकतीच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याच मुलाखतीवरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

"सुषमा अंधारे या माझ्यासारख्या वाटत होत्या," असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. अमृता फडणवीस यांच्या या विधानावरच अंधारे यांनी सवाल केला आहे. त्यांची ही फेसबूक पोस्ट सध्या चांगलीच चर्चित आली आहे. (Latest Marathi News)

काय आहे सुषमा अंधारे यांची ती पोस्ट...

या व्हायरल पोस्टमध्ये सुषमा अंधारे (Susmha Andhare) म्हणतात की, अमृता वहिनींना (Amruta Fadanvis) मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्यामध्ये?"

या पोस्टमध्ये त्या पुढे म्हणतात की, "मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का? पण छे! कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही,"

राज ठाकरेंवरही साधला निशाणा...

या मुलाखतीवरुन सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. "मराठी मनाचे मानबिंदू असणारे, मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवा चा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ ची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंज चे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT