Anil Parab Kirit Somaiya Contraversy Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya: अनिल परब आक्रमक! किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ? 'नाहक बदनामी झाल्याचे सांगत थेट...'

या प्रकरणामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याचे अनिल परब यांनी या प्रस्तावामध्ये म्हणले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: गेल्या काही दिवसांपासून भाजपा खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब यांनी म्हाडाची जमीन हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाची नोटीसदेखील गेली होती. पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली होती.

यावरुन आता अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली असून विधान परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध आक्रमक होत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. अनिल परब यांनी आज विधान परिषदेत सोमय्या आणि म्हाडाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रकरणामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याचे अनिल परब यांनी या प्रस्तावामध्ये म्हणले आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकरणावर आता विशेष हक्क समिती आता या प्रकरणात चौकशी करुन काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले अनिल परब...

“महाराष्ट्र विधान परिषद नियम 241 अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देतोय. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो”, असं अनिल परब विधान परिषदेत म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT