Uddhav-Raj Thackeray Alliance 
महाराष्ट्र

Uddhav-Raj Thackeray Alliance: ठाकरे बंधुंची परदेशवारी; राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंचा परदेश दौरा, परदेशात होणार युतीचा निर्णय?

Uddhav-Raj Thackeray Alliance: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेही परदेश दौऱ्यावर गेलेत. त्यामुळे युतीची चर्चा सातासमुद्रापार होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मस्कर, साम प्रतिनिधी

राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा निघाला, पॉडकास्टवरच्या मुलाखतीतून राज ठाकरेंनी साद दिली, उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा थेट देशपातळीवर सुरू झाली. या चर्चा सुरू असताना राज ठाकरे मात्र परदेशात होते आणि त्यापाठोपाठ उध्दव ठाकरेही कुटुंबासमवेत परदेशवारीवर गेले. त्याआधीच राज ठाकरेंनी 29 एप्रिलपर्यंत कार्यकर्त्यांना युतीबाबत चर्चा करू नका, असे आदेश दिलेत आणि संजय राऊतांनीही त्याचीच री ओढली.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा परदेशात होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही 2009 ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती. त्यावेळी ठाकरे बंधू परदेशात युतीच्या चर्चेसाठी गेले होते. त्यावेळी पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या सांगतायत सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खऱे

हिंदी विरोधासाठी आणि मराठीच्या आग्रहासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. मात्र राज्याच्या हितासाठी,मराठीच्या कल्याणासाठी आणि ब्रँड ठाकरे जपण्यासाठी तसंच ठाकरेंच्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी ठाकरे बंधू सूत जुळवणार की पुन्हा केवळ राजकीय कंड्या पिकवून युतीच्या चर्चा थंडं बस्त्यात जाणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT