TET scam: आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक SaamTV
महाराष्ट्र

TET Exam scam: आरोग्य पेपरफुटी प्रकरणाला वेग; आणखी एका आरोपीला अटक

आरोग्य विभाग गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखीच वेग आला

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: शिक्षक पात्रता परीक्षेचे अनेक घोटाळासमोर आल्यावर पोलिसांनी (police) कारवाई करत काहींना अटक (arrested) करण्यात आली होती. यानंतर आता आरोग्य विभाग (Health Department) गट 'ड' परीक्षा पेपरफुटीच्या तपासाला आणखीच वेग आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या पेपरफुटीसंदर्भामध्ये आणखी एकाला अटक (arrested) करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्जुन भरत राजपूत असे आहे. त्याला औरंगाबाद (Aurangabad) मधून अटक करण्यात आली आहे. आरोपी अर्जुन राजपूत हा औरंगाबाद या ठिकाणी म्हाडा (MHADA) परीक्षेकरिता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली आहे. अर्जुन राजपूत याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (TET scams speed up health paperfooty case Accused arrested)

हे देखील पहा-

पेपरफुटीच्या म्होरक्याला अटक

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलिसांना हवा असलेला हा मोहरक्या अखेर पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख रा.थेरला ह.मु. अंकुशनगर बीड, असे अटक केलेल्या आरोपी मोहरक्याचे नाव आहे. अतुल राख हा अगोदर अटकेत (arrested) असणाऱ्या, आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याचे सर्व बोगस कामाचे रॅकेट अतुल राख चालवत होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. अखेर काल त्याच्या पुण्यातुनचं पोलीसांनी मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या आहेत.

आरोग्य भरतीतील गट 'क' आणि गट 'ड' या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. यातील केवळ संजय शाहुराव सानप हा पोलीसांनी जेरबंद केलेला आहे. तर अतुल राख याच्या मुसक्या आवळल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान बोगस आरोग्य भरती प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्ह्यतील ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अद्याप अनेक रॅकेट चालवणारे मोहरे खुलेआम फिरत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT