भीषण अपघात! सांगोल्यात ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

भीषण अपघात! सांगोल्यात ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

नऊ जण जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - भरधाव मालट्रक आणि ओम्नीकारचा भीषण अपघात Accident झाला आहे. हा अपघात करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील Flyover सर्विस रोडवर घडला आहे. यामध्ये कारचालकासह दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू Death झाला आहे. तर नऊ जण जखमी झाले आहेत.

हे देखील पहा -

या अपघातात चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे राहणार उदनवाडी तालुका सांगोला व प्रवासी कावेरी मनोज हरिजन रा. विजापूर व गुड्डी चंद्रकांत मिगरी, गुलबर्गा यांचा मृत्यू झाला आहे.बारा प्रवाशांना घेऊन कर्नाटकातील शिंदगी येथे जात असताना कारंडेवाडी फाट्याजवळ उजव्या बाजूला सर्विस रोडने जात असताना समोरून येणाऱ्या मालट्रकची आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की कार चालक दाजीराम शिंगाडे जागीच ठार झाले. तर कावेरी हरिजन हिच्या डोक्याला आणि तोंडावर मार लागला होता. तिला उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर गुड्डी मगिरी हिला उपचाराकरिता घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला.उर्वरीत जखमींना उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT