Solapur -अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात! सहाजण गंभीर जखमी विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात! सहाजण गंभीर जखमी

२ दिवसांपूर्वीच वर्ध्यामध्ये कार अपघातामध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आज सोलापूरमध्येएक विचित्र अपघात झाला आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर: २ दिवसांपूर्वीच वर्ध्यामध्ये (Wardha) कार अपघातामध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आज सोलापूरमध्ये (Solapur ) एक विचित्र अपघात (accident) झाला आहे. कार आणि २ ट्रकमध्ये हा भीषण (Terrible) अपघात झाला आहे. यामध्ये ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Terrible accident on Solapur Akkalkot highway)

हे देखील पहा-

सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. वळसंग (Walsang) पोलिस (Police) ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका २ ट्रक आणि ७ सीटर कार या एकामागून एक अशा धडकल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस (Police) तिथे पोहोचले आहेत. क्रेनच्या साह्याने कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. याकरिता २ तासांचे प्रयत्न करण्यात आले आहेत.

सचिन सुरेंद्र खटके (वय-२५), सपना सचिन खटके (वय-२५), परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय-४०), पल्लवी गिरिष तिवारी (वय-२८), व ३ लहान मुले सर्व रा .उस्मानाबाद; तसेच ट्रक चालक गणेशन या जखमींना बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT