Car Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील 2 ठार

अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Car Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. हा भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत झाला आहे.

या अपघातात मुंबईतील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी. जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (७१), रमेश मुसळे (५१), माधुरी मुसळे (५०) आणि रुचिक देसाई (३०) हे चौघे मुंबई (Mumbai) अहमदाबाद महामार्गावरून पालघरला (Palghar) कारने जात होते. सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कर थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. या अपघातात (Accident) कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक

या भीषण अपघातात जखमी झालेल्या २ जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे (५१) आणि रुचिक देसाई (३०) या दोघांचा मृत्यू झाला. तर अशोक मुसळे (७१) आणि माधुरी मुसळे (५०) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोड च्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT