Accident News  Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा - मोठ्या थाटामाटात उदघाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वरून नागपूरच्या दिशेने जात असताना वाशिमच्या कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात झाला ही घटना ताजी  असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.  (Samruddhi Mahamarg Accident News)

या अपघात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. समृद्धी महामार्गावर चॅनेज 327.8 जवळ नागपूर कॉरिडॉर वर रात्री हा अपघात झाला. दोन ट्रकच्या अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय.

एक ट्रक औरंगाबाद हुन नागपुरच्या दिशेने जात असताना चालकाला अचानक झोप लागली त्यामुळे हा ट्रक सुरक्षा भिंतीवर आदळून महामार्गाच्या आकस्मित लेन मध्ये पलटी झाला त्या मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाला हा अपघातग्रस्त ट्रक न दिसल्याने मागून येणारा हा ट्रक अपघातग्रस्त ट्रकवर आदळला.

या ट्रकचा चालक ज्ञानेश्वर कातकडे रा.पैठण हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून महामार्गावरील ट्रक क्रेनच्या साहायाने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमी चालकांवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT