ट्रक- लक्झरीबसचा भीषण अपघात, 12 प्रवासी जखमी, 3 गंभीर संजय जाधव
महाराष्ट्र

ट्रक- लक्झरीबसचा भीषण अपघात, 12 प्रवासी जखमी, 3 गंभीर

रस्त्यावरील खड्डा वाचविताना लक्झरीने समोरून आलेल्या ट्रकला भीषण धडक दिल्याने सकाळच्या सुमारास अपघात

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : रस्त्यावरील खड्डा वाचविताना लक्झरीने समोरून आलेल्या ट्रकला भीषण धडक दिल्याने सकाळच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात १२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारकरिता भरती करण्यात आले आहे. मध्यप्रदेशच्या उजैन येथून अमरावतीकडे जाणाऱ्या लक्झरी ट्रायव्हल्स बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कोलोरी फाटा गावानजीक सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

ट्रकला जोरात धडक दिल्याने अपघात झाला आहे. या ट्रायव्हल्स बस मध्ये एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. मात्र या राष्ट्रीय मार्गावर प्रचंड खड्डे असल्याने खड्डा चुकविताना समोरून येणाऱ्या ट्रकला भिडली असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अपघातात बस चालकासह इतर १२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर यात ३ जण गंभीर झाले आहेत.

सकाळची वेळ असल्यामुळे सर्व प्रवासी झोपलेले अवस्थेत होते. यामुळे सर्व प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रायव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाताची खामगाव ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले आहे. तसेच ट्रक चालक आणि बस चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT