Latur : अहमदपूरमध्ये युवकाच्या मृत्यूने तणाव, प्रेमसंबंधातून हत्येचा संशय! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : अहमदपूरमध्ये युवकाच्या मृत्यूने तणाव, प्रेमसंबंधातून हत्येचा संशय!

टेंभुर्णी येथील 19 वर्षीय जेसीबी चालक कोंडीबा श्रीपती कासले याचे गावातील एका मुली सोबत प्रेम संबध होते. यातून या पुर्वी दोन्ही कुटुंबात दोन वेळा वाद झाला होता.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : लातुर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथील दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह आज गावातील विहिरीत आढळला असून, शारीरिक व मानसिक त्रास देत घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. टेंभुर्णी येथील 19 वर्षीय जेसीबी चालक कोंडीबा श्रीपती कासले याचे गावातील एका मुली सोबत प्रेम संबध होते. यातून या पुर्वी दोन्ही कुटुंबात दोन वेळा वाद झाला होता. कोंडीबा कासले 16 ऑक्टोबर रोजी घरा बाहेरील शेडमधे एकटाच झोपला होता. दरम्यान, कोंडीबाचा भाऊ रात्री एक वाजता घरी आला असता कोंडीबा झोपलेल्या ठिकाणी फक्त चप्पल व मोबाईल आढळून आल्याने त्यांनी घरात झोपलेल्या माणसांना ही माहिती दिली.

हे देखील पहा :

या प्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी कोडिंबाच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार अहमदपूर पोलिसात दिली. दरम्यान, आज कोंडीबाचा मृतदेह मौजे टेंभुर्णी शिवारातील विहिरीत आढळून आला.  कोंडीबाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपी अटक झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयासमोर वाहनात ठेवला.

या प्रकरणी मयताची आई शशीकला कासले यांच्या फिर्यादीवरून देवानंद मनोहर गायकवाड, सुहास खंडेराव गायकवाड, एकनाथ निवृत्ती गायकवाड सर्व ( रा. टेंभुर्णी.ता.अहमदपूर) अक्षय जळबा गायकवाड ( रा. मोहिजा परंडा ता. कंधार ) विश्वंभर गणपती मसुरे, मुलीचा मावस भाऊ (रा.हाळी ता.उदगीर) यांच्या विरोधात अहमदपूर पोलीसांत गुन्हा नोंद झाला असून तीन आरोपीस अटक करण्यात आली आहे. युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद व आरोपींना अटक होई पर्यंत शवविच्छेदन व अंतविधी करणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने कांही काळ तणाव निर्माण झाला होता. गुन्हा नोंद व आरोपींना अटक झाल्यावर मृतदेह गावी नेऊन अंत्यविधी करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT