karad, bank of india, atm center, satara crime news saam tv
महाराष्ट्र

Karad : एटीएमच्या ठिक-या; एसपींनी 'त्या' डॅशिंग पाेलिसांना दिलं दहा हजार रुपयांचे बक्षीस

या चोरट्यांकडे चार पेट्रोल बाँब सापडले आहेत.

संभाजी थोरात

क-हाड : क-हाड (karad) नजीकच्या गजानन हाउसिंग सोसायटी येथील बँक ऑफ इंडियाच्या (bank of india) एटीएममध्ये (atm) मध्यरात्री चार चोरटे चोरी करत असताना कराड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्वरित घटनास्थळी जाऊन त्यांना जीवाची पर्वा न करता पकडणा-या चार पोलिसांना एसपी अजयकुमार बन्सल यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारिताेषिक जाहीर केले आहे. (karad crime news)

या संशयित आरोपींनी एटीएममध्ये जिलेटीन ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने जिलेटीनचा त्याच एटीएममध्ये स्फोट केला आणि जिलेटीन निकामी केले. जिलेटीन मोठ्या क्षमतेचे असल्याने मोठा स्फोट झाला त्यामुळे परिसर दणाणला.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (ajaykumar bansal) , अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अजित बोरहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील घटनास्थळी पोहचले. यावेळी ज्या चार पोलिसांनी चोरट्याला पकडले त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जाहीर केले.

एसपी बन्सल म्हणाले या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा पुण्यातील आहे. अन्य काहीजण पळून गेलेत. त्यातील एकजण स्थानिक आहे. पाेलिस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT