- शुभम देशमुख
Bhandara Crime News : अज्ञात चोरट्यानी शहरातील गुरुनानक नगर येथील सिंधुताई महिला नागरी पतसंस्था सहकारी बँकेच्या शटरचे कुलूप व कँश रुमचे ड्रॉप तोडुन बँकेमध्ये आत प्रवेश करुन तिजोरीतील १० लाख ३३ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे करीत आहेत.
ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील महिला सहकारी बँकेत घडली. चोरी गेलेल्या मुद्देमालात ५०० रुपयांच्या १४८३ नोटा एकुण ७४१५००, २०० रुपयांच्या ८१० नोटा एकुण १६२०००रुपये, १०० रुपयांच्या १००८ नोटा एकुण १८०० रुपये, ५० रुपयांच्या २४९ नोटा एकुण १२४५० रुपये २० रुपयांच्या ५०७ नोटा एकुण १०१४० रुपये तसेच १० रुपयांच्या ३९६ नोटा एकुण ३९६० रुपये आणि चिल्लर नाणी २५०८ रुपये असे एकूण नगदी १०,३३,३५८ रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. (Maharashtra News)
याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक चेतन चिंधालोरे यांनी तुमसर पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध (अपराध क्र.४६२/२०२३ कलम ४५७,३८०,३४ भांदवी नुसार) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे करीत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.