55 हजारांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडले ! Saam Tv
महाराष्ट्र

55 हजारांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडले !

एका वाळूचे टिप्पर सोडविण्याकरीता ही लाच मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राजेश काटकर

परभणी: सोनपेठ येथील तहसीलदार आशिषकुमार बिरादार (Tahsildar Ashishkumar Biradar) यांना एका तक्रारकर्त्याकडून 55 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सोमवारी (दि.02) सायंकाळी ताब्यात घेतले असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. एका वाळूचे टिप्पर सोडविण्याकरीता ही लाच मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत सोनपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सेलू येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी मागितलेल्या दीड कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या जिल्ह्यातील आणखी एका अधिकार्‍याविरुध्द केलेल्या या धाडसी कारवाईने जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

➡ युनिट : परभणी

➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 22वर्ष

➡ आरोपी: 1)आशिष कुमार बिरादार वय 43 वर्षे, तहसीलदार ता सोनपेठ जि. परभणी

2) सय्यद इसाक सय्यद रहीम,वय 30 वर्ष,संगणक ऑपरेटर, तहसील सोनपेठ ,जि परभणी

➡ लाचेची मागणी- 55,000/-

➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक:- 30/07/2021

➡ लाच स्विकारली:- 55000रु दिनांक 2/8/2021

➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांना रेती ची ट्रक ने वाहतूक करण्यासाठी व वाहतूक करीत असताना कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून 55000 रु लाचेची मागणी करून आरोपी क्रमांक 1 ने आरोपी क्रमांक 2 चे मार्फतीने स्वीकारली

➡ यशस्वी सापळा दिनांकः- 2/08/2021 रोजी शिवाजी चौक सोनपेठ

➡ मार्गदर्शन:-

श्रीमती कल्पना बारवकर, पोलिस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र.

➡ सापळा पथक :- निलेश सुरडकर, पोलीस उपअधीक्षक हिंगोली, श्री भरत हुंबे पोलीस उप अधीक्षक ,परभणी व ला प्र वि टीम परभणी /हिंगोली

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Yoga: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग रोज करा 'ही' सोपी योगासने

Alpha Box Office Collection : 'अल्फा'नं पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, आलिया-शर्वरीच्या ॲक्शन अन् ग्लॅमरची जादू फेल? वाचा कलेक्शन

School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

SCROLL FOR NEXT