Crime news Saam tv
महाराष्ट्र

WhatsApp ग्रुपवर न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून तरुणावर अल्पवयीन मुलांचा प्राणघातक हल्ला

नाशिकमध्ये जिव घेणे हल्ल्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये खुनासारखे गंभीर गुन्हे देखील घडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - पंचवटी परिसरातील नागरीकांच्या व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ग्रुपवर न विचारता समाविष्ट केल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिक (Nashik) पंचवटी परिसरातील  रहाणारा दिपक डावरे हा तरुण देवी मंदिर मैदानावर क्रिकेट खेळत असतांना संशयित दोन विधी संघर्षित मुले मैदानावर आली. दोघांनी दिपक याच्या सोबत वाद घातला. शिविगाळ करत एकाने सोबत आनलेल्या कोयत्याने दिपकच्या पोटावर वार केला. वार पोटात खोल घुसल्याने दिपकचा कोथळा बाहेर आला. इतर मित्रांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलीस पथकाने संशयितांचा शोध सुरु केला. दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल केला.

विजय नगर काॅलनी हिरावाडी येथे येथील समाधान आहिरे यांनी त्यांच्या परिसरातील नागरीकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या ग्रुप मध्ये संशयित विधी संघर्षित बालकांना न विचारता समाविष्ट केले. याचा जाब विचारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणाऱ्या मुलाचा मित्र दिपक डावरे यास जाब विचारला असता तीघांमध्ये बाचाबाची झाली. वादाचे रुपांतर हणामारीत झाले. यातील एकाने कोयत्याने दिपकच्या पोटावर वार करुन गंभीर जखमी केले.अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. दोघांची चौकशी केली असता किरकोळ कारणातून हा हल्ला झाला झाल्याची माहिती समोर आली. एकूण क्षुल्लक कारणावरून नाशिकमध्ये जिव घेणे हल्ल्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये खुनासारखे गंभीर गुन्हे देखील घडत आहे. त्यामुळे अशा घटनेमुळे पोलिसांची डोके दुःखी चांगलीच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT