Team India 
महाराष्ट्र

Team India : विजयी जल्लोषात सांगलीत गालबोट, मिरजेत जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी

Sangli news : सांगलीच्या मिरजेत भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना दोन गट एकत्र आल्याने पोलिसांनी जमावाची पांगवापांग केली.

Namdeo Kumbhar

Sangli Latest News : भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या विजयानंतर देशभरात उत्साह अन् जल्लोष होता. महाराष्ट्रही मागे नव्हता. पुणे, मुंबई आणि सांगलीमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर येत आपला आनंद साजरा केला. पण सांगलीमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागले आहे. भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना सांगलीच्या मिरजेत दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. जल्लोषावेळी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. अखेरीस पोलिसांनी मध्यरात्री गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पांगवले.

भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. याचवेळी दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी जल्लोष सुरू होता. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटाला पांगवले.

रोहित शर्माच्या नेतृ्तवातील भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगली अन् मिरजेत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून दणदणीत विजय मिळवला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकामध्ये मिरजकारांनी जोरदार जल्लोष केा. फाटाके फोडत, घोषणाबाजी करत क्रिकेट प्रेमींनी आंनद व्यक्त केला. पण याच विजयी जल्लोष साजरा करताना दोन गटात बाचाबाची झाली. पोलिसांनी लाठी चार्ज करत जमावाला पांगवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT