Teacher Pension Saam TV
महाराष्ट्र

Teacher Pension: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांनी रक्ताने लिहिले पत्र

महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Teacher Pension: जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करीता डीसीपीएस/ एनपीएस हटाव पेन्शन बचाव कृती समिती व शिक्षक तक्रार निवारण समितीच्या वतीने शिक्षक नेते अजय भोयर यांच्या नेतृत्वात सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. वर्धेच्या बॅचलर रोड येथील संपर्क कार्यालयात जुनी पेन्शन योजना लागू करा आणि एनपीएस योजना बंद करा या मागणीचे पत्र शिक्षकांनी स्वतःच्या रक्ताने लिहून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक व कर्मचारी यांची जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना केंद्र शासनाने लागू केली. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन (Pension) योजना लागू करावी. तसेच राज्यात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या हजारो शिक्षकांची जुनी पेन्शन योजना शासनाने हिरावून घेतलेली आहे.

बरेचसे शिक्षक सेवानियुक्त झालेले आहे आणि ते वेठबिगारीचे जीवन जगत आहेत. सातत्याने या मागणी करीता आंदोलने करून अजूनही शिक्षक (Teacher) कर्मचारी यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे क्लेशदायक पद्धतीने शिक्षकांनी स्वत: च्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री आणी पंतप्रधानांना पाठवलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT