Tea Price Increase Saam Tv
महाराष्ट्र

Tea Price Increase: चहाप्रेमींसाठी वाईट बातमी! चहाचा एक कप महागला, ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार

Tea Price Increase: चहाच्या दरात झालेल्या वाढीमुळे चहाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. महागाईचा परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चावर होत असून ग्राहकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

रणजीत माजगावकर, साम टिव्ही

Tea Price Increase: सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट तुमच्या- आमच्या रोजच्या चहावरही होताना दिसतोय. इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे चहा विक्रेत्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर टीसीए टी कॉफी असोसिएशनने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. ग्राहकांना दर्जेदार चहा देण्यासाठी प्रति कप एक रुपयाने दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील चहा विक्रेत्यांवर झाला आहे. गॅस दरवाढ आणि अनियमित पुरवठ्यामुळे चहा बनवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय.

टीसीए टी कॉफी असोसिएशन अंतर्गत येणारे विक्रेते सध्या या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेल्या खर्चामुळे चहाचा दर्जा टिकवणे कठीण जात असतानाही ग्राहकांना उत्तम प्रतीचा चहा देण्याचा निर्धार असोसिएशनने व्यक्त केलाय.

ग्राहकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार असोसिएशनने केला आहे. या निर्णयामुळे विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून ग्राहकांनाही पूर्वीसारखाच दर्जेदार चहा मिळत राहणार आहे. दरवाढीचा छोटा फटका बसणार असला तरी चहाचा दर्जा कायम राहणार असल्याने ग्राहकांकडूनही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT