Tanaji Sawant News Saam Tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant News : सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी तानाजी सावंत आग्रही; भाजप -शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटणार?

Solapur News : डाॅ.सावंत यांनी अचनाक सोलापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : सोलापूरच्या पाकमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेचे आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो, परंतु मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले हे माझे दुर्देव आहे.

अशी खंत तानाजी सावंत यांनी व्यक्त करत अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा मला सोलापूरचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील असा थेट दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्री पदावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  (Latest Marathi News)

सोलापूरचे (Solapur) पालक मंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते महसूमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता मूळचे सोलापूरचे असलेल्या डाॅ.सावंत यांनी अचनाक सोलापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आरोग्यमंत्री डाॅ.सावंत (Tanaji Sawant) यांच्या हस्ते रात्री पंढरपूर येथे वडार भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी सोलापूरचे पालकमंत्री न मिळाल्याची खदखद देखील बोलून दाखवली.

मी सोलापूरचे पालक मंत्री मागत होतो. तरीही मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले. दुर्दैव आहे मी तीकडे गेलो. अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूरच्या पालक मंत्रीपदासाठी माझा विचार करतील असेही डाॅ.सावंत म्हणाले.

डाॅ.सावंत यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आपण बंड केले असा गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता सोलापूरच्या पालकमंत्री पदावरुन अजूनही वेळ गेलेली नाही बघू काय होत ते असे सूचक विधान डाॅ.सावंत यांनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT