Beed News Saam Tv
महाराष्ट्र

पाचशे रुपयांची लाच घेणं तलाठ्याला भोवलं; एसीबीने पंचासमक्ष पकडलं

नामदेव राजेंद्र पाखरे वय 36 असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

विनोद जिरे

बीड - शिरूर कासार तालुक्यात, पाचशे रुपयांची लाच घेणं एका तलाठ्याला चांगलचं भोवलं असून त्याला बीड (Beed) एसीबीने पंचासमक्ष पकडलं आहे. शेतकऱ्याकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा कागदपत्रांसाठी 1 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष तलाठ्याने मान्य केले आहे. नामदेव राजेंद्र पाखरे वय 36 असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

हे देखील पहा -

पाखरे हे बीडच्या शिरुर तालुक्यात असणाऱ्या गोमाळवाडा सज्जाचे तलाठी असून सध्या सध्या मंडळाधिकारी कार्यालय शिरुर येथे कार्यरत आहेत. पाखरे यांनी तक्रारदाराकडे सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी 1 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी पाखरे तलाठ्यावर बीड एसीबीने कारवाई केली आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT