Bribe Saam tv
महाराष्ट्र

Bribe: सहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

९ डिसेंबरला याबाबतची तक्रार केली होती.

विजय पाटील

सांगली : वडिलाेपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील चुकीची दुरूस्ती करण्यासाठी सहा लाख रूपये लाचेची (bribe) मागणी केल्याप्रकरणी सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा (walva) तालुक्यातील फाळकेवाडी येथील तलाठी (talathi) विकास ऊर्फ राजू तातोबा गुरव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) अटक (arrest) केली. या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (sangli latest marathi news)

फाळकेवाडी परिसरातील एका तक्रारदाराने तलाठी गुरव याच्या विरुद्ध ६ लाख रूपयांची लाच मागितल्याची तक्रार ९ डिसेंबरला केली होती. त्यानुसार एसीबीने डिसेंबर आणि ३ जानेवारीस पडताळणी केली. तेव्हा तलाठी याने सातबारावरील चुकीची दुरूस्ती करण्यासाठी सहा लाख रूपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान तलाठी गुरव याला कारवाईबाबत शंका आल्यामुळे त्याने लाच स्विकारली नाही. त्यामुळे त्याने लाच मागितल्याबद्दलचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयास सादर केला होता. या अहवालानुसार गुरव याच्यावर लाच मागितल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले गेले हाेते. त्यानुसार पथकाने गुरव याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT