Ulhasnagar Crime News अजय दुधाणे, उल्हासनगर
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News:वडिलांवर असलेला राग मुलावर काढत तरुणावर धारदार हत्याराने वार; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

प्रथमच्या पोटात, हाता पायावर आणि मानेवर त्यांनी चाकूने वार केले.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्व वैमनस्यातून मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसलेल्या सचदेव नगर परिसरात चौघांनी मिळून एका तरुणावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात सदर तरुण बचावला असून त्याच्यावरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम संदीप गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. काल रात्री प्रथम त्याच्या घराजवळ असलेल्या रस्त्यावर उभा होता. त्यावेळी चार अज्ञात तरुण दुचाकीवरून त्याच्या दिशेने आले. ते आपल्याला मारण्यासाठी येत आहेत याचा अंदाज प्रथमला आला होता. त्याने लगेचच तिथून पळ काढला.

मात्र हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेत प्रथमच्या पोटात, हाता पायावर आणि मानेवर त्यांनी चाकूने वार केले. तसेच लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर चौघांनी तेथून पळ काढला. सदर घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना पूर्व वैमनस्यातून घडली आहे. यात प्रथम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन वर्षां आधी प्रथमचे वडिल संदीप गायकवाड यांच्यावर देखील आरोपींनी गोळीबार केला होता.

२१ ऑक्टोंबर २०२० रोजी उल्हासनगरच्या (Ulhasnagar) श्रीराम चौकात याच आरोपींनी रिव्हाल्वर मधून गोळी झाडली होती. यात संदीप यांच्या पायाला गोळी लागली मात्र त्यातून ते बचावले होते. त्यामुळे हल्लेखोरांनी वडिलांवरचा राग मुलावर काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT