राज्यातील महिला अत्याचार मोडीत काढायला योग्य पावलं उचलत आहोत - गृहमंत्री दिलीप कांबळे
महाराष्ट्र

राज्यातील महिला अत्याचार मोडीत काढायला योग्य पावलं उचलत आहोत - गृहमंत्री

गुन्हेगार हा कोणत्या पक्षाचा, पंथाचा आहे हे बघितलं जात नाही. तर, समाजात असलेली विकृती मोडून काढायची आहे. त्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे.

दिलीप कांबळे

मावळ : गुन्हेगार हा कोणत्या पक्षाचा, पंथाचा आहे हे बघितलं जात नाही. तर, समाजात असलेली विकृती मोडून काढायची आहे. त्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहे. येणाऱ्या काळात ही विकृती मोडुन काढली जाणार आहे. असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मावळ मधील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीप हंगामाच्या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना केले.

हे देखील पहा :

महाविकास आघाडी सरकार हे लोकधार्जिणे नाही तर कार्यकर्त्यांना पोसणारे सरकार आहे अशी टीका चित्रा वाघ यांनी काल केली. त्यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले ज्याच्या त्याच्या विचाराचा हा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच स्तरातील लोकांच्या हिताचा विचार करून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कोणी कोणत्या चष्म्यातून बघतो हे महत्वाचे आहे. हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग असतो. संस्कृती प्रमाणे कसे बोलावे, वागावे, राहायचं हे ठरवायचं असत.

शरद पवारांनी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात घालवला आहे. त्यांनी समाज हिताची जितकी कामे केली ती आणखी कोणीही करू शकणार नाही. आणि पवार साहेबांची बरोबरी कोणी करू शकणार नाही. पवार साहेबांचे स्थान हे जनतेच्या हृदयात अढळ आहे अशी टिप्पणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेला उत्तर देताना केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेपरफुटी, खासगीकरण, आरक्षण; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरे काय म्हणाले?

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

SCROLL FOR NEXT