OBC Meeting In Hingoli Saam tv
महाराष्ट्र

OBC Meeting In Hingoli: छगन भुजबळांची हिंगोलीत सभा, ४ लाख ओबीसी बांधव एकवटणार; सभा उधळून लावण्याचा इशारा

Chhagan bhujbal OBC Sabha In Hingoli: राज्यातील ओबीसी समुदायाचा दुसरा महामेळावा हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणार आहे.

Vishal Gangurde

संजय सूर्यवंशी, संदिप नागरे

Chhagan bhujbal OBC Meeting Hingoli:

राज्यातील ओबीसी समुदायाचा दुसरा महामेळावा हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी चार लाख ओबीसी बांधव एकवटणार आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत ही सभा होणार आहे. मात्र, ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे. (Latest Marathi News)

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, त्यानंतर ओबीसी समाजाचा दुसरा मेळावा हिंगोलीत पार पडणार आहे. मात्र, हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'भुजबळांची सभा उधळणार'

'छगन भुजबळांनी त्यांचा लढा लढवा, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. अन्यथा 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणारी छगन भुजबळ यांची ओबीसींची सभा उधळून लावू, असा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांनी दिला आहे.

हिंगोलीत चार लाख ओबीसी बांधव एकटवणार

राज्यातील ओबीसींचा दुसरा महामेळावा हिंगोलीतील रामलीला मैदानावर होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली ओबीसीच्या महामेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. चार लाख ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी एकवटणार असल्याने आयोजकांच्या वतीने विशेष अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे. या महामेळाव्याला येणाऱ्या ओबीसी बांधवांच्या वाहनांसाठी हिंगोली शहराच्या प्रमुख पाच महामार्गांवर दीडशे एकरपेक्षा अधिक जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT