Ravikant Tupkar, Buldhana
Ravikant Tupkar, Buldhana saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar Aandolan : तगडा पाेलिस बंदाेबस्त छेदत रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

संजय जाधव

Ravikant Tupkar Aandolan News : शेतकऱ्यांच्या (farmers) अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोयाबीन (soyabean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र (central governement) आणि राज्य सरकार (maharashtra government) गंभीर नसल्याचा आराेप करीत आज (शनिवार) स्वाभिमानी संघटनेचे संघटक रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर यांचे आंदाेलन हाेऊ नये यासाठी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त हाेता. पाेलिसांना तुपकरांनी चकवा देत स्वत: पाेलिसांचा (police) ड्रेस परिधान करुन आंदाेलन केले.

सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत पिकविमा (crop insurance), अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेतली हाेती.

एक तर आत्मदहन करु द्या, अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला आता मागे हटणार नाही असा निर्धार रवीकांत तुपकर यांनी केला हाेता. त्यादिवसापासून पाेलिस त्यांच्या मागावर हाेते. परंतु ते भूमीगत झाले. आज त्यांचे आंदाेलन हाेऊ नये यासाठी पाेलिस प्रयत्नशिल हाेते परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तुपकर यांनी पाेलिसांच्या वेषात येऊन आंदाेलन छेडले. यावेळी तुपकर यांचे समर्थक माेठ्या संख्येने आंदाेलनस्थळी हाेते. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: काँग्रेसचा बडा नेता गोत्यात, अकोल्यात गुन्हा दाखल; प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

SCROLL FOR NEXT