swabhimani shetkari sanghtana 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनाे! ऊस तोडीची घाई करू नका; साखरेचा भाव वाढणार आहे

विजय पाटील

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुभी कासारी, दत्तसह आठ कारखान्यांनी आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातील शीरगुप्पी सहकारी साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी FRP जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील एका ही कारखान्याने एक रकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे कारखाने एक रक्कमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील मात्र जे जाहीर करणार नाहीत ते कारखाने बंद पाडू आणि तोडी देखील बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीचे swabhimani shetkari sanghtana जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद नुकतीच झाली. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांनी एक रकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. त्या कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात प्राधान्याने महापुरात बुडालेला ऊस गाळप करावा. त्या कारखान्यांच्या बाबतीत ऊस तोडी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील असे खराडे यांनी नमूज केले.

ते म्हणाले जे कारखाने एक रकमी एफआरपी जाहीर करणार नाहीत त्यांचा हंगाम सुरू होवू देणार नाही. त्याच्या तोडी बंद पाडल्या जातील. शेतकऱ्यांनी ऊस तोडीसाठी घाई करू नये. कारण साखरेचे भाव सध्या ३५ रुपये आहेत. ब्राझील या देशात दुष्काळ असल्याने जगभर साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहणार साखरेचा दर ४० रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक रकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जे शक्य होते. ते सांगली जिल्ह्यात का शक्य होत नाही असा सवाल करून खराडे म्हणाले शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा, थोडा संयम पाळून आंदोलनाला सहकार्य करावे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT