OBC आरक्षणाला स्थगिती; वर्ध्यात भाजपाचे आक्रोश आंदोलन सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

OBC आरक्षणाला स्थगिती; वर्ध्यात भाजपाचे आक्रोश आंदोलन

ओबीसी आरक्षणावरून आता राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झाल्यात. भाजपाच्या वतीने आज वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) आज ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणावरून आता राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झाल्यात. भाजपाच्या (BJP) वतीने आज वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) विरोधात निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

हे देखील पहा :

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा कोर्टात सादर न केल्यामुळे या सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवता आले नाही. तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. मात्र, या सरकारला ते करता आलं नाही. हे सरकार ओबीसींच्या विरोधी सरकार आहे म्हणून आज आमचं आक्रोश आंदोलन सुरु असल्याचे भाजप कार्यकर्ते म्हणाले.

जो पर्यंत ओबीसींना आरक्षण ठाकरे सरकार देणार नाही तोपर्यंत आम्ही आक्रोश आंदोलन करत राहू असे भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले आहे. ओबीसी चे आरक्षणाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी जागा रिक्त ठेवण्याचे माननीय न्यायालयाचे आदेश आहेत. येत्या 21 तारखेला नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीत आता ओबीसींना मुकावं लागणार आहे. राज्य सरकार या निवडणुका कसे घेणार आहे हे पाहावे लागणार आहे असे भाजपाचे प्रदेश सचिव राजेश बकाने यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

SCROLL FOR NEXT