Police  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra: सराफ व्यावसायिकास त्रास दिल्याने अधिकाऱ्यासह सहा पोलिस निलंबित

अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगाव मधील सराफा व्यावसायिकला अटक केली होती.

जयेश गावंडे

अकोला : चोरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका संशयित आरोपीने अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि अश्लील छळ केल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणामुळे अकोल्यात (akola) एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यांसह सहा पोलिसांना (police) निलंबित करण्यात आले आहे. (suspension of police officer along with six constables in akola). अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगाव मधील सराफा व्यावसायिकला अटक केली होती. शाम वर्मा (shyam varma) असं या पीडित संशयित आरोपीचे नाव.

शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आपल्याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला गेला. दरम्यान आरोपीला न्यायालयाने (court) पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोपही तक्रारकर्ता याने केला होता.

या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी दाेन चौकशी समिती नेमल्या. या दोन्ही समित्यांचा अहवाल उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचं कळतंय. परंतू प्राथमिक चौकशीत सराफ व्यवसायिकावर कारवाईसाठी गेलेली पोलीस टीम दोषी आढळल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार यांना निलंबीत करण्यात आलं आहे. या प्रकरणात साम टीव्ही न्युज ने पीडित सराफ व्यवसायिकाची बाजू लावून धरली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT