Sushma Andhare On On Karnataka Election Result Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare On On Karnataka Election Result: 'पप्पू पास नही हो गया; मेरिट में आ गया'; कर्नाटक निवडणुकीवरून सुषमा अंधारेंचा भाजपला टोला

Sushma Andhare latest News: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपला 'पप्पू पास नही हो गया; मेरिट में आ गया', अशा शब्दात टोला लगावला आहे.

संजय डाफ

Nagpur News: कर्नाटक निवडणुकीचे कल हाती आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने कर्नाटकात बहुमताचा आकडा पार केला आहे. कर्नाटकात राहुल गांधी जादू चालली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा घटला अशी चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपला 'पप्पू पास नही हो गया; मेरिट में आ गया', अशा शब्दात टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना अंधारे यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. अंधारे म्हणाल्या, 'महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच देशभरामध्ये 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणनारे लोक होते. त्या सर्व भक्तांसाठी चपराक आहे'.

'सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण, ऊर्जा केली होती. त्याला सर्व कंटाळले आहेत. कर्नाटकमधील निकालाची विजयाची ऊर्जा ही महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

' राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेलने पप्पू म्हणून हिणवलं. तेच राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आणि राहुल गांधींच काय तर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट में आ गया, अंधारे पुढे म्हणाल्या.

दरम्यान, सुषमा अंधारे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत हॉटेल रेडिसनच्या लॉबीत अनौपचारिक चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये कर्नाटकाच्या निवडणुकीवरून चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT