Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: डिनो मारियाचा फोटोवरून सुषमा अंधारेंनी नितेश राणेंना डिवचलं, पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो केला ट्विट

Dino Maria Photo : सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर डिनो मारियाचा पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट केलाय. फोटो पोस्ट करताना अंधारेंनी नितेश राणेंना टोला लगावला.

Bharat Jadhav

Sushma Andhare Post Dino Morea photo:

डिनो मारियाचा फोटो पोस्ट करत शिवसेनेच्या नेत्या सुषमा नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आमदार नितेश राणेंना परत एकदा तोंडघशी पाडलं. आदित्य ठाकरे डिनो मारियाच्या घरी पार्टी करत असल्याचा आरोप नितेश राणे करत होते, त्याला सुषमा अंधारेंनी उत्तर दिलंय.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर डिनो मारियाचा पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट केलाय. फोटो पोस्ट करताना अंधारेंनी नितेश राणेंना टोला लगावला. कोरोना काळात आदित्य ठाकरे डिनो मारियाच्या काळात घरी पार्टी करत होते, असा आरोप नितेश राणे करत होते. तोच डिनो मारिया पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या ख्रिसमस कार्यक्रमात हजेरी लावतो. ते भाजपला चालतं, मग आदित्य ठाकरेंवर त्याच्यावर का टीका केली जाते, असा सवाल अंधारेंनी या पोस्टमधून केलाय. फोटो पोस्ट करताना त्यांनी नितेश राणेंना टोला मारला.

डिनो मारियावरून आदित्य ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे आजारी असल्याचा फायदा घेत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करत गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. त्यावरून उत्तर देताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरी झाली असं म्हणता, मग मुंबईचे लोक जेव्हा कोरोनाच्या नावाने मरत होते,आजारी होते तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटनमंत्री (आदित्य ठाकरे) संध्याकाळी ७ वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?”असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला होता. एका बाजूला मुंबईचे लोक कोरोनामध्ये त्रस्त होते तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी सातच्यानंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? असा प्रश्न नितेश राणेंनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

SCROLL FOR NEXT