Sushilkumar Shinde Saam tv
महाराष्ट्र

Sushilkumar Shinde: सोलापूर लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोण? धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांची मोठी घोषणा

विश्वभूषण लिमये

Sushilkumar shinde News:

देशात दसऱ्याची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे धम्मच्रक्र प्रवर्तन दिनही मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. देशासहित राज्यात सण-उत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळत आहे. याचदरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

'मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार असतील. असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं. तसेच सामूहिक बुद्धवंदना केली. 'देशभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे. दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. मात्र, मी आज योगायोगाने सोलापुरात आहे. यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

दरम्यान, धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत असतानाच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार लोकसभेच्या उमेदवार असतील, असं सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मला जे करता येईल, ती मदत मी करणार, असं देखील सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाष्य करताना सुशील कुमार शिंदे म्हणाले, 'बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आम्हाला दिली. या घटनेनुसार आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही पक्षाला राजकारण करता येत नाही असं सिद्ध झालं आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT