Sushil Kedia News  Saam tv
महाराष्ट्र

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Sushil Kedia News : राज ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाने आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमित शहा यांचं नाव देखील आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मराठी भाषा शिकणार नाही, असं उद्दामपणे म्हणणाऱ्या उद्योगपती सुशील केडियाचं ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं. मनसेने ऑफिस फोडल्यानंतर जाग आलेल्या सुशील केडियाने सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली. ठाकरेंची माफी मागितल्यावर सुशील केडियाने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केडियाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केलं आहे.

राज्यात मराठी भाषेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मिरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यालाही मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

या मारहाणीनंतर राजकीय वातावरण तापलं असताना उद्योगपती सुशील केडियाने राज ठाकरेंना डिवचलं होतं. '३० वर्षांपासून मुंबईत राहतोय. पण मला मराठी येत नाही. तुमच्या वाईट वागणुकीमुळे मराठी शिकणार नाही', असे केडियाने म्हटलं होतं. सुशील केडियाच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळ ढवळून निघालं. त्यानंतर आज केडियाने सोशल मीडियावर माफी मागितली आहे. मात्र, आज शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत पोस्ट केली आहे.

सुशील केडियाने पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती केली. 'जर कोणाला शून्याला शून्याने कसं भागायचं माहीत असेल, तर त्याच्या कर्तृत्वाला मर्यादा उरत नाहीत. ते फक्त अमित शहा यांना जमू शकतं. त्यामुळे त्यांना आधुनिक चाणक्य म्हटलं जातं, असे सुशील केडियाने म्हटलं आहे.

कोण आहे सुशील केडिया?

सुशील केडिया हा उद्योजक आहे. त्याची केडिया नॉमिक नावाची कंपनी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील नामांकित व्यावसायिक म्हणून त्याची ओळख आहे. केडिया हा गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत व्यवसाय करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT