बुलढाणा अर्बनमध्ये सर्व्हेक्षण; आयकर विभागाची ६ तासापासून चौकशी सुरु संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणा अर्बनमध्ये सर्व्हेक्षण; आयकर विभागाची ६ तासापासून चौकशी सुरु

आयकर विभागाच्या ११ जणांच्या एका पथकाकडून बुलढाणा अर्बन पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : आयकर विभागाच्या ११ जणांच्या एका पथकाकडून बुलढाणा अर्बन पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

प्रामुख्याने उच्च- मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचे विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्येने हे सर्व्हेक्षण होत असल्याचा माहिती मिळाली आहे. मागील १८ तासापासून आयकर खात्याच्या या ११ जणांच्या पथकाकडून या ठिकाणी सर्व्हेक्षण केले जात आहे. यासंदर्भात संबंधित पथकाकडून प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले जात आहे.

बुलढाणा अर्बनचे सर्व्हेसर्वा राधेश्याम चांडक यांच्याकडून अधिकृत स्तरावर याबाबत कुठली माहिती दिली गेली नाही. वर्तमान स्थितीत बुलढाणा अर्बनच्या बुलढाणा येथील मुख्य शाखेसमोर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. काल पासूनच हे सर्व्हेक्षण सुरू झाले आहे.

प्रामुख्याने राधेश्याम चांडक यांची कॅबीन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबीनमध्ये हा अधिकारी वर्ग रेकॉर्डची तपासणी करत आहे. अन्य कोणाला त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. येथील सर्व्हेक्षण हे उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe: झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्त्यासाठी बनवा पनीर भुर्जी, वाचा सोपी रेसिपी

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी त्वचेवर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सतर्क

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

SCROLL FOR NEXT