Suresh Dhas Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: मुंडेंची घटीका जवळ आलीय, आता फक्त अजित पवारांनी...सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, त्यांची घटीका जवळ आलेली आहे. फक्त अजित पवार यांनी निर्णय बदलू नये, सुरेश धसांची प्रतिक्रिया.

Bhagyashree Kamble

'धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, त्यांची घटीका जवळ आलीय, हे मला कळतंय पण आता अजित पवार यांनी निर्णय बदलू नये', असे भाजपचे आमदार सुरेश यांनी म्हटलंय.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही छायाचित्र समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलंय. मोकारपंती या ग्रुपमध्ये एका आरोपीनं व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओतील काही छायाचित्र समोर आले आहेत. यानंतर सर्वत्र बाजूनं धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.

दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील छायाचित्रे सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक नागरीकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलेलं नसेल. अत्यंत क्रुर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. फोटो व्हायरल होताच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीवर नेत्यांनी जोर दिला आहे.

अशातच भाजप आमदार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावावा, त्यांची घटीका जवळ आलीय, हे मला कळतंय पण आता अजित पवार यांनी निर्णय बदलू नये. त्यांच्या राजीनाम्यामुळे आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बळ मिळणार नाही', असं सुरेश धस म्हणालेत.

'संतोष यांच्यावर झालेल्या क्रूर मारहाणीचे छायाचित्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीनं पाहिलेत. हे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक माणूल रडला असेल. इतके भयंकर कृत्य या नराधमांनी केलंय. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता राजीनामा घेत मुंडेंना ते घरी पाठवतील', असंही धस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईच्या भांडुपमध्ये पालिका अधिकाऱ्याला मारहाण

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या अडचणीत; पुणे पोलिसांत तक्रार, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT