Supriya Sule Saam TV
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी मानले राज ठाकरे, फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे जाहीर आभार!

केतकी चितळे या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यांनतर तिला अटक करण्यात आली होती. आज ठाणे न्यायालयाने केतकी चितळेला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळे या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहितरी लिहिलं आहे. कुठल्याच कायद्यात हे बसत नाही, हे खूप दुर्दैवी आहे. न्यायालयं त्याच काम करेल राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा समर्थन नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस याचेही जाहीर आभार मानले आहे. कारण त्यांनी पोस्ट केलेल्या व्यक्तीविरोधात निषेध नोंदवला होता. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील अशी ग्वाहीही सुप्रिया सुळेंनी दिली आहे. 55 वर्ष हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी कोणाला अस उत्तर दिलं नाही, ही आमची संस्कृती नाही मला त्याचा अभिमान आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

काल उद्धव ठाकरे यांनी सभेतून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या ''यंत्रणांचा गैर वापर होतो हे वास्तव आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या बाबत काय झालं? 109 वेळेस देशमुख यांच्यावर रेड करण्याचा विक्रम केंद्राने केला आहे. मग 108 वेळेस तुम्ही काय करत होतात? काहीच मिळालं नाही म्हणून एवढ्या वेळेस रेड करावी लागते ना? म्हणत सुप्रिया सुळे यांनीही तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT