Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Jayant Patil On Ajit Pawar: 'अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही', जयंत पाटील यांचं वक्तव्य

'अजित पवार यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही', जयंत पाटील यांचं वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

Jayant Patil On Ajit Pawar: राष्ट्रवादीवादी पक्षात महत्वाचे फेरबदल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''अजित पवार यांच्यावर अन्याय झालेला नाही.''

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील म्हणाले की, ''राष्ट्रवादी पक्षाचे दोन कार्याध्यक्षांची नेमणूक झाली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रीय स्तरावर नेमणूक झाली आहे. त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या दोघांबरोबर इतर जे राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांना जबाबदारी दिली आहे.''  (Latest Marathi News)

अजित पवार यांच्याबद्दल काय म्हणाले?

या निर्णयामुळे अजित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर जयंत पाटील म्हणाले की, अजित दादा यांच्या उपस्थितीत हे निर्णय झाले असून यानंतर ते कार्यक्रम झाल्यावर निघून आले. आमच्या पक्षात शंका पसरवण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. अजित पवार यांच्यावर अन्याय झाला नाही. राज्य स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नावर उत्तर देणे योग्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली.

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT