supriya sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule News Today: राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News: या घोषणेनंतर राजकिय वर्तुळातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी अखेर भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ही मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Political News)

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपल्याला दिलेल्या जबाबदारीसाठी आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, " राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार."

मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्या दिशेने पाऊले उचलत २ मे रोजी शरद पवारांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नंतर कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अशात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी आपला निर्णय जाहीर केला.

कोणाकडे कोणत्या राज्याची जबाबदारी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी न दिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी राजकीय ड्रामा नाट्य, नंतर बहिष्कार नाट्य; साताऱ्यात युती फुटली, पडद्यामागं काय काय घडलं?

Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : एलपीजी टंचाईने जळगावकर हैराण; एजन्सी बंद, ग्राहकांचा संताप

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

SCROLL FOR NEXT