Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

'शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल'

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी सुरु आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी सुरु आहे. याच सुनावणी दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) कोसळलं तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं अशी शक्यता पटोले यांनी व्यक्त केली. ते अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारच मुळात असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील सदस्यत्व अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना त्यांचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय वैध कसे असा सवालही यावेळी नाना पटोलेंनी केला.

पाहा व्हिडीओ -

शिवाय राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पदयात्रेमूळेच सरसंघचालकांना मस्जिदीला भेट घावी लागल्याचा टोला देखील पटोले यांनी यावेळी लगावला. तसंच दहशतवादी कायवायांना पाठिंबा देत घातपात करण्याच्या तयारीत असणाऱ्या 'पीएफआय' (PFI) संस्थेवरील बंदीसंदर्भात केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही नाना पटोलेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

Pune Land Scam: पुण्यात पुन्हा जमीन घोटाळा? 750 कोटींच्या जमिनीची 33 कोटीत विक्री

Pune Accident: १२ गाड्यांचा चक्काचूर, ८ जणांचा मृत्यू; पुण्यातील नवले पुलावरील कंटेनरचा अपघात नेमका कसा घडला?

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT